एका डॉलरच्या तुलनेत रुपया 73.33वर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरूच आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 73.33 रुपयांवर पोहचला आहे.

डॉलरच्या तुलनेत तब्बल 40 पैशांची घसरण झाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची मागणी वाढत चालल्याने रुपया गर्तेत सापडला. बँका, आयातदार, ऑईल रिफायनर्स यांच्याकडून डॉलरच्या विक्रमी मागणीने रुपयावर प्रतिकुल परिणाम झाला. 

रुपयामध्ये होत असलेली घसरण व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलांच्या किंमतीध्ये होत असलेली सातत्याने वाढ यामुळे भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live