महाराष्ट्रावर पाणीटंचाईचं संकट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

एप्रिल महिन्याची चाहुल लागत असतानाच उन्हाच्या वाढत्या तडाख्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. कडक उन्हाला अख्खा एप्रिल आणि मे महिना सरायचा बाकी असून, आतापासून राज्यातील खेड्यापाड्यांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील 43 हजार 665 गावांपैकी 26 हजार 341 खेडी आणि 12 हजार 956 वस्त्या-वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याची माहिती राज्य सरकारने केंद्राला दिली आहे. या गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यास राज्य सरकारने 573.13 कोटींचा प्रस्ताव दिला आहे.

एप्रिल महिन्याची चाहुल लागत असतानाच उन्हाच्या वाढत्या तडाख्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. कडक उन्हाला अख्खा एप्रिल आणि मे महिना सरायचा बाकी असून, आतापासून राज्यातील खेड्यापाड्यांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील 43 हजार 665 गावांपैकी 26 हजार 341 खेडी आणि 12 हजार 956 वस्त्या-वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याची माहिती राज्य सरकारने केंद्राला दिली आहे. या गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यास राज्य सरकारने 573.13 कोटींचा प्रस्ताव दिला आहे. या योजनेंतर्गत नवे बोअर घेणे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, बोअरची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खासगी विहिरी यांसारख्या अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live