मद्यधुंद अवस्थेत चालकाने फुटपाथवर चढवली कार; धडकेत अनेक जणांना उडविले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

बंगळूर : बंगळूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका कारचालकाने थेट फुटपाथवर कार नेत पादचाऱ्यांना उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बंगळूर : बंगळूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका कारचालकाने थेट फुटपाथवर कार नेत पादचाऱ्यांना उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बंगळूरमधील एचएसआर भागात रविवारी ही घटना घडली आहे. फुटपाथवर चालत असलेल्या नागरिकांना या मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने धडक दिली. ही धडत एवढी भीषण होती, की अनेक जणांना त्याने उडविले. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कर्नाटक पोलिसांनी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ प्रसारित केला आहे. रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकींना धडक देत कार फुटपाथवर आलेली दिसत आहे. 

Web Title: drunk person drove his car over pedestrians on a footpath in Bangalore
 
संबंधित बातम्या

Saam TV Live