मास्तर तुम्ही पण... शिक्षक दिनीच वर्गात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

जालन्यात जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने वर्गात दारू पिऊन धिंगाणा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

भोकरदन तालुक्यातील वडशेद गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडलाय. संजय चौधरी असे या शिक्षकाचं नाव आहे. सध्या सोशल मिडीयावर या तर्राट शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. शाळेतील मुलं वर्गात येऊन वर्गात बसली होती.

मात्र, हे महाशय दारू पिऊन वर्गात चटईवर लोळत होते. याबाबत विचारणा केली असता शिक्षकानं उडवाउडवीची उत्तरं दिली. सोशल मीडियावर या टल्ली शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिक्षकाकडून काय आदर्श घ्यावा असा सवाल उपस्थित केला जातोय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live