23 जूनपासून 25 जूनपर्यंत 'ड्राय डे'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

येत्या वीकेंडला कोकणात जाऊन 'चिल' करण्याच्या योजना आखणाऱ्या मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागात सलग तीन दिवस ड्राय डे असणार आहे.

विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगत भागात येत्या वीकेंडला म्हणजे 23 जूनपासून 25 जूनपर्यंत 'ड्राय डे' घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येता वीकेंड 'कोरडा'च जाईल. 25 जूनला महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक आहे.

मुंबईत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 25 जूनला मतदान होणार आहे. कोकणात पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे, तर नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live