डि. एस. कुलकर्णी यांच्या शहरामध्ये आढळल्या 25 मालमत्ता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

पुणे : ठेवीदारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डि. एस. कुलकर्णी यांच्या शहरामध्ये आणखी 25 मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्ताबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडुन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

पुणे : ठेवीदारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डि. एस. कुलकर्णी यांच्या शहरामध्ये आणखी 25 मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या मालमत्ताबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडुन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मागील वर्षी ठेवीदारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहूणी अनुराधा पुरंदरे, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर यांना अटक केली होती. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडे 33 हजार ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.दरम्यान, कुलकर्णी व त्यांच्या साथीदाराविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दोषारोपत्रामध्ये कुलकर्णी यांनी ठेवीदारांची तब्बल २ हजार ४३ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे नमुद केले होते. 

दरम्यान,सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाच्या आदेशानंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. तेव्हा कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे स्पष्ठ झाले होते. त्याचबरोबर कुलकर्णी यांच्या पुणे शहरात आणखी मालमत्ता असल्याचीही माहिती तपासामध्ये पुढे आली असल्याचे सुत्रानी सांगितले.

डिएसकेंच्या नव्याने आढळलेल्या मालमत्ता
धायरी येथे कुलकर्णी यांच्या १२ मालमत्ता आहेत. याबरोबरच पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी  या ठिकाणीही मालमत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. या जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांची किंमत बाजारभावानुसार दोनशे ते तीनशे कोटी रूपये असु शकते. या मालमत्ताच्या विक्रीतुन ठेवीदार, बँकांचे पैसे देणे शक्य होणार आहे.

Web Title: DS Kulkarni new properties found in police investigation at Pune


संबंधित बातम्या

Saam TV Live