डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

बातमी आहे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केलेल्या डीएसकेंच्या संदर्भातली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय. बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारीही या घोटाळ्यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या 3 अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या तीनही अधिकाऱ्यांना अटक होण्याचीही शक्यातय.

रविंद्र प्रभाकर मराठे, आर के गुप्ता आणि पद्माकर देशपांडे असं या तीन अधिकाऱ्यांचं नाव आहे. ताब्यात घेतलेल्या इतर व्यक्तींमध्ये बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशिल मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता, आणि  डी. एस. कुलकर्णी  डॅव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर यांचाही समावेश आहे. एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

नियमांचं उल्लंघन करुन कर्ज दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर केला जातोय. आर्थिक गुन्हे शाखेला या तिघांच्या चौकशीतून काय अधिक माहिती मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live