डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. 

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. 

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पद आणि अधिकाराचा गैरवापर करत कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता आणि विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती. 

मराठे यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. कुलकर्णी यांना आभासी तारणावर कर्ज दिल्याप्रकरणी पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचेही अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते. 'अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्त्वात आहे. ही कारवाई करताना काही नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते', असेही या अधिकाऱ्याने नमूद केले होते.

WebTitle : DSK money laundering case bank of maharashtra cases on employees


संबंधित बातम्या

Saam TV Live