वांद्रे स्टेशनवरील गोंधळ ऑनलाईन बुकींगमुळे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 एप्रिल 2020

15 एप्रील रोजी लॉकडाऊन उघडल्यानंतर आपल्या राज्यात जाता येईल या आशेने त्यांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील आगाऊ तिकीट बुकिंग सुरू असल्याने ऑनलाईन बुकिंग केली होती.

 लॉकडाऊनच्या काळात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी रेल्वेने आपली आरक्षण तिकीट खिडकी सुद्धा बंद केली होती. दरम्यान ऑनलाईन तिकीट बुकिंग सुद्धा बंद करणे आवश्‍यक असतांना, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळवरून ऑनलाईऩ तिकीट बुकिंग सुरू होते. त्यामुळे मुंबईत अडकलेल्या उत्तरभारतीयांनी 15 एप्रील नंतरचे आरक्षण केले होते. दरम्यान अचानक लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्याने, वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रवाशांमध्ये तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत रोजगारासाठी आलेले लाखो उत्तरभारतीय नागरिक लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. हॉटेल, मेस, किंवा मिळेल ते खाऊन पोट भरणाऱ्या उत्तरभारतीयांची लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहाची अडचण होत आहे. त्यामूळे त्यांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. 15 एप्रील रोजी लॉकडाऊन उघडल्यानंतर आपल्या राज्यात जाता येईल या आशेने त्यांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील आगाऊ तिकीट बुकिंग सुरू असल्याने ऑनलाईन बुकिंग केली होती.

मात्र, राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये वाढ झाल्याची घोषणा केली. तर त्यानंतर केंद्र सरकारने हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत राहील असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अस्वस्थ उत्तरभारतीयांनी वांद्रे रेल्वे स्थानकांवर जमाव केला. त्यामूळे जमावबंदीची परिस्थिती निर्माण होऊन गोंधळ उडाल्याचे दिसून आले आहे. वांद्रे येथील गोंधळानंतर आता रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीचे ऑनलाईन संकेतस्थळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयाने ऑनलाईन तिकीट बुकिंग बंद करण्यासंदर्भात काहीही सुचना दिल्या नव्हत्या, त्यामूळे आयआरसीटीसीची ऑऩलाईन बुकिंग सुरूच होती. आता ही ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा मंगळवार पासून बंद करण्यात आली आहे - सिद्धार्थ सिंह, जनसंपर्क अधिकारी,आयआरसीटीसी


संबंधित बातम्या

Saam TV Live