अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर; शेतकरी हवालदिल 

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई  
शुक्रवार, 3 मे 2019

निम्मा महाराष्ट्र आधीच दुष्काळात होरपळत असतानाच आता त्यात मान्सून लांबणीवर पडण्याच्या शक्यतेनं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरवर्षी ७ जूनला मान्सूनचं आगमन होतं. मात्र, यंदा जूनच्या शेवटी मान्सून हजेरी लावेल आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 

अल निनोचा प्रभाव कमी होत असला तरी तो पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या पर्जन्यमानावर होणार आहे. राज्यात साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होतं. मात्र, यंदा मान्सून जूनअखेरीस राज्यात दाखल होईल. त्यामुळे पेरण्यांना उशीर होणार आहे. 

राज्यात पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकट उभं असताना पाऊस लांबणार असल्यानं पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सलग दुसर्‍या वर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती निर्माण झालीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live