ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये थोडक्यात टळला चेंगराचेंगरीचा प्रसंग

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

मध्य रेल्वेच्या नाकर्तेपणाचं हे आणखी एक ढळढळीत उदाहरण.केवळ नशीब बलवत्तर म्हणून याठिकाणी एलफिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळलीय.नेहमीच रडत रखडत चालणाऱ्या मध्य रेल्वेला पावसाचं निमित्त झालं आणि लोकल वाहतूक पुरती कोलमडली.मध्य रेल्वे तब्बल दीड ते दोन तास उशिरानं धावत असल्यानं ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली. अशातच दहाच्या सुमारास एक लोकल आली आणि महिला डब्यासमोर अशी झुंबड उडाली. 

डब्यातून उतरणाऱ्या महिला आणि डब्यात चढणाऱ्या महिला समोरासमोर आल्या.यात चेंगराचेंगरी होऊन 10 ते 15 महिला जखमी झाल्या स्थानकावर असलेल्या एका पोलिसानं गर्दीला आवरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचेही प्रयत्न अपुरे पडले.केवळ नशिब बलवत्तर म्हणून याठिकाणी मोठी चेंगराचेंगरी झाली नाही. याला सर्वस्वी रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. 

 मध्य रेल्वेकडून रेल्वेच्या देखभाल दुरूस्तीसाठी नियमितपणे मेगाब्लॉक घेतले जातात. पण दोन-चार तासांच्या पावसातही रेल्वेचा कसा फज्जा उडतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.लेटलतीफ मध्य रेल्वेचे बाबू लोक काय करतात असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय. डीआरएम आणि त्यांचे सहकारी वातानुकुलित कार्यालयात बसून रेल्वेचा कारभार हाकत असतील तर एक दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. 
 
Web Title: Due to heavy rains, the incident of the stampede at the Thane railway station was avoided

संबंधित बातम्या

Saam TV Live