दुमका कोषागारातून अवैध पद्धतीने पैसे काढल्याच्या प्रकरणी लालू प्रसाद यादवांना एकूण 14 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

दुमका कोषागारातून अवैध पद्धतीने 13.31 कोटी रुपये काढल्याच्या प्रकरणी, लालू प्रसाद यादवांना एकूण 14 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूण दोन प्रकरणात त्यांना 7-7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून. लालू प्रसाद यादवांना 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणांत आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने यापूर्वीच कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यापूर्वीच्या तीन शिक्षांपैकी चाईबासाच्या दोन प्रकरणात प्रत्येकी पाच वर्षं, तर तिसऱ्या देवघर प्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दुमका कोषागारातून अवैध पद्धतीने 13.31 कोटी रुपये काढल्याच्या प्रकरणी, लालू प्रसाद यादवांना एकूण 14 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूण दोन प्रकरणात त्यांना 7-7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून. लालू प्रसाद यादवांना 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणांत आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने यापूर्वीच कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यापूर्वीच्या तीन शिक्षांपैकी चाईबासाच्या दोन प्रकरणात प्रत्येकी पाच वर्षं, तर तिसऱ्या देवघर प्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुमका प्रकरण चारा घोटाळ्यातील चौथे प्रकरण असून यातील शिक्षा ही यादव यांना झालेली सर्वाधिक शिक्षा आहे. बिरसा मुंडा जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या लालूंची तब्येत बिघडल्याने, रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर, शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील करणार असल्याचं तेजस्वी यादवांनी सांगितलं.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live