पाहा, लॉकडाऊनकाळात कोणत्या सेवा सुरु तर कोणत्या बंद असतील?

साम टीव्ही
शनिवार, 18 एप्रिल 2020

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसंच अटी आणि शर्तींच्या अधारे काही उद्योग, व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसंच अटी आणि शर्तींच्या अधारे काही उद्योग, व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय. काही उद्योग, व्यवसाय सुरू झाल्यास अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू का होईना फिरत राहील. यादृष्टीनं सुधारित नियमावली जारी करण्यात आलीय. साम आणि सकाळनं या संदर्भात सर्वात आधी भूमिका घेतली होती. अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालवायचा असेल तर काही अंशी काळजी घेऊ उद्योग, व्यवसाय सुरू करावेत अशी भूमिका साम टीव्हीनं घेतली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील याबाबत सुतोवाच केलं होतं. त्यानंतर आता सरकारनं प्रत्यक्षात कृती करायला सुरूवात केलीय. 

पाहा सविस्तर...

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना  सुरू करण्यात येणार आहे.  जेणेकरून राज्यतच्या अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होईल. यादृष्टीने राज्य सरकारने आता सुधारित मार्गदर्शक आदेश जारी केलेत. 

२० एप्रिलनंतरही हे बंदच राहणार 

 • सिनेमागृहं आणि मॉल्स, जिम, स्विमिंग पूल्स , थिएटर्स , स्पोर्ट्स सेंटर्स 
 • आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेवा, बार्स 
 • सामाजिक, धार्मिक , राजकीय, क्रीडा कार्यक्रम
 • जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक
 • रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस 
 • शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस 

२० एप्रिलपासून 'या' गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी

 • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
 • जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेजेस
 • शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं, मत्स्य व्यवसाय, सिचन प्रकल्प, मनरेगाची कामं
 • डिजिटल व्यवहार
 • आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स ( ५० टक्के कर्मचारी )  
 • कुरिअर सेवा
 • ऑनलाईन शिक्षण
 • सरकारी कार्यालयं
 • आरोग्य सेवा
 • लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स , मोटेल्स अंडी क्वारंटाईन सेंटर्स 
 • इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्स, मोटार मेकॅनिक्स, IT सुविधा देणारे कर्मचारी  
 • कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित राहून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन करायचे आहे . सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live