ई-सिगारेटमुळे आरोग्याला धोका?

ई-सिगारेटमुळे आरोग्याला धोका?

ई-सिगारेटच्या केवळ एका सेवनाने हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीत बदल होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे या अभ्यासादरम्यान ई-सिगारेटच्या द्रव्यांमध्ये आरोग्यास हानिकारक असलेल्या निकोटीन या रसायनाचा वापरदेखील करण्यात आला नव्हता.

या अभ्यासात म्हटले आहे की, ई-सिगारेटच्या एका सेवनाने निरोगी लोकांच्या रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीवर तात्पुरता परिणाम होतो. जसे की या अभ्यासादरम्यान केवळ एका सेवनानंतर पायात असलेल्या फिमोरॉल धमनीतील रक्त प्रवाहात बदल झाल्याचे आढळून आले. मात्र, काही मिनिटातच या धमनीचे कार्य पूर्वपदावर येऊन, नियमितपणे सुरळीत सुरु झाले. परंतू, हा बदल कोणत्या रसायनांमुळे झाला हे संशोधक स्पष्ट करू शकले नाही. हा निष्कर्ष ३१ निरोगी व ई-सिगारेटचे सेवन न करणाऱ्या लोकांवर केलेल्या प्रयोगाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. 

एखादी व्यक्ती नियमितपणे ई-सिगारेटचे सेवन करत असेल. तर अशा व्यक्तीच्या हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सहजतेने पूर्वपदावर येऊ शकत नाही. नियमित सेवनामुळे अशा व्यक्तींमध्ये एथेरोस्क्लेरोसिसस हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधींचा रोग बळावण्याची शक्यता अधिक असते. असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

पेशींच्या अस्तित्वाला धोका
यापुर्वीही मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून ई-सिगारेटच्या सेवनामुळे शरिरातील कमकूवत पेशींच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याचे आढळून आले होते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी असलेल्या पेशींमधील एका प्रकारात जळजळ होत असल्याचे आढळून आले होते.

Web Title: e-cigarettes affect the functioning of blood vessels?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com