शासनाचा निर्देश येईपर्यंत ई-पास सक्तीचेच, मात्र ई-पासमुळे सर्वसामान्यांना भुर्दंड

साम टीव्ही
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020
  • महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाहीच
  • शासनाचा निर्देश येईपर्यंत ई-पास सक्तीचेच
  • ई-पासमुळे सर्वसामान्यांना भुर्दंड
  • सामान्यांच्या तक्रारींचा लवकरच फेरविचार

केंद्र सरकारनं ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात सध्यातरी ई- पासची अट रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. राज्यात कोरोना रुग्णवाढीमुळं काही काळ तरी ई- पास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची  माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. ई-पास रद्द झाली तर मुक्त संचार होईल.

पाहा नेमके कसे असतील नियम आणि विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती -

त्यामुळं कोरोनाचा वेगानं प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही त्यांनी म्हटलंय. राज्य शासनाने ई-पासबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने. अजूनही नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावे लागणार आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live