सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि आसामला भूकंपाचे धक्के

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

कोलकाता : ईशान्य भारतातील राज्यांसह बिहार व पश्चिम बंगालला आज (ता. 12) सकाळी सव्वादहच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर व आसाम या राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा बांगलादेशमधील रंगपूर येथील होता. भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती, तर 25 ते 30 सेकंदांपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. 

बिहारमधील पूर्णिया, किशनगंज, कटिहार भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, त्यामुळे अनेकजण लगेच घराबाहेर पडले. कोणतीही जीवित व वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

आज (ता. 12) पहाटेच हरियाणसह जम्मू-काश्मिरच्या काही भागात भूकंपाचा धक्का जाणवला होता. हरियाणात पहा़टे पावणेसहाच्या दरम्यान हा धक्का जाणवला, तर जम्मू-काश्मिरला सव्वापाचच्या दरम्यान हा धक्का जाणवला होता. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी होती.    

Web Title: earthquake in bihar west bengal and north east states

संबंधित बातम्या

Saam TV Live