ऐतिहासिक कंदिलांनी उजळणार महाराष्ट्र!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

कल्याण - दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे कंदील दाखल झाले आहेत. उत्कृष्ट रंग, आकर्षक डिझाईनने ग्राहकांचे लक्ष वेधणारे आणि प्रकाशाने झगमगणारे कंदील यंदा शिवरायांच्या पराक्रमांच्या प्रकाशाने उजळणार आहेत. कल्याण-डोंबिवलीत हे आगळेवेगळे ऐतिहासिक कंदील तयार करण्याच्या कामाला वेग आला असून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज (शंभूराजे) यांच्या छायाचित्रासह त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या राजमुद्रा असलेल्या या आकाश कंदिलाला राज्यभरातून मागणी वाढत आहे. यंदाच्या दिवाळीत हा कंदील इतिहासाच्या स्मृतींची रोषणाई करणार आहे. 

मराठा मूक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी मराठा अर्थक्रांती ही चळवळ साकारली जात आहे. या चळवळीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीत सक्रिय असणारे श्‍याम आवारे यांनी हा आकाशकंदील बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी शहरांमधील विविध महिला बचत गटांना आणि बेरोजगार तरुणांना विविध कामांची वाटणी करून देण्यात आली असून त्यांना रोजगाराची संधी मिळाली आहे. सुमारे ५० हजार कंदील बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गडचिरोली, सातारा, कोल्हापूर आणि अन्य शहरांतूनही या कंदिलाला मोठी मागणी आहे. कल्याण शहरातून सुमारे १० हजार कंदिलांचे बुकिंग आतापर्यंत झाले आहे.    

२०० लोकांना रोजगार
कंदील बनविण्यासाठी महिला बचत गटांचा हातभार लागत आहे. कल्याण येथील पत्री पूल परिसरात कंदील विकण्यासाठी दुकान सुरू करण्यात आले आहे. कंदिलाच्या रोषणाईसाठी तरुणांची मदत घेतली जात आहे, तर कंदिलाची होम डिलिव्हरी देण्याची सेवाही देण्यात आली असल्याने या विविध कामामुळे सुमारे २०० लोकांना रोजगार मिळणार आहे.

कंदिलामागचे हेतू 
 छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 
 छत्रपती शंभू राजे आणि त्यांच्या राजमुद्रेतून त्यांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या

कंदिलाची वैशिष्ट्ये 
 किंमत - साडेतीनशे रुपये   इकोफ्रेंडली 
 फिरता कंदील रंग बदलणारी रोषणाई 

WebTitle : marathi news eco friendly and traditional diwali lanterns 

संबंधित बातम्या

Saam TV Live