कर्मचाऱ्यांना सतावतेय नोकरी गमावण्याची चिंता; खासगी कंपन्यांमधील कर्मचारी डिप्रेशनचे शिकार

माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सध्या मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी आलेल्या व्यक्तींच्या रांगा वाढतायत. अनेक कंपन्यांमध्ये वर्षानुवर्षे वेगवेगळ्या हुद्द्यांवर कामं करणारी ही लोकं. मात्र सध्या आर्थिक मंदीमुळं त्यांना नोकरी गमावण्याची त्यांना सतावतेय. यातून ते इतक्या डिप्रेशनमध्ये गेले की अखेर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली. 

खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी सध्या मानसिक तणावात आहे. सर्वांनाच नोकरी गमावण्याची चिंता सतावतेय. मानसोपचार तज्ज्ञांकडे अशा रुग्णांची संख्या वाढलीय. यामध्ये ऑटोमोबाइल, टेलिकॉम, रियल एस्टेट आणि फायन्स कंपन्यांमधील कर्मचारी आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनच्या अहवालानुसार देशात 5.6 कोटी भारतीय डिप्रेशनचे शिकार आहे. यातील 13.8 कोटी चिंताग्रस्त आहे. विशेष म्हणजे खासगी नोकरी करणाऱ्या प्रत्येक पाच मधील एक व्यक्ती वर्कप्लेस डिप्रेशनची शिकार आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनचे हे आकडे नक्कीच धक्कादायक आहेत. एकीकडे मोदी सरकार देशात आर्थिक मंदी नसल्याचा दावा करतंय दुसरीकडे मात्र आर्थिक मंदीची भीती कर्मचाऱ्यांचा जीवावर उठल्याचं चित्र आहे. त्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच या कर्मचाऱ्यांची चिंता दूर होईल या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live