...म्हणून अंडी महागली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जुलै 2018

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे अशी जाहिरात आपण नेहमी पाहतो. सर्वसामान्यांचा प्रोटिनयुक्त आहार असलेलं हेच अंडं आता सामान्यांनासाठी महाग झालंय. गेल्या काही दिवसांपासून अंड्यांचा भाव वधारलाय.. मुंबईत अंडी 70 ते 80 रुपये डझननं विकली जातायत. याच हिशोबानं एक अंडं 6 ते 7 रुपये नग या दरानं विकलं जातंय.

अंडेविक्रेत्यांना आणखी एक डोकेदुखी आहे. ती म्हणजे खराब रस्त्यांची. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अंडी फुटत असल्याची विक्रेत्यांची तक्रार आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत अंड्यांचं उत्पादन घटतं. त्यामुळं त्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येतंय. अंड्यानं खाल्लेला भाव हा काही दिवसांपुरता असून  अंड्याचे दर पुन्हा  सामान्य पातळीवर येतील असं घाऊक विक्रेते सांगतायत. अंडी स्वस्त होतील तेव्हा होतील आता तरी अंडी खाताना हात आखडताच ठेवावा लागणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live