कमल हसन यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; फेकली अंडी

कमल हसन यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; फेकली अंडी


चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो. इतिहासामध्ये असे अनेक दहशतवादी आहेत जे वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो. त्यामुळे आपण कोणत्याही जाती-धर्मावर आरोप-प्रत्यारोप करु शकत नाही. अमूक एक धर्म आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा नीच आहे असे आपण म्हणून शकत नाही. एवढेच नाही तर प्रत्येक धर्मामध्ये दहशतवाद असतो याला इतिहास साक्ष आहे. त्या दिवशीदेखील मी हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होतो.'

कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता 'प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो', असे वक्तव्य करत कमल हासन यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

कमल हसन यांना वादग्रस्त वक्तव्यानंतर सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. आरावकुरी येथे गुरुवारी (ता. 16) एका प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र, राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण, अशा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे. कमल हसन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. शिवाय, पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवण्यात आल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, कोईंबतूरमधील सुलूर येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कमल हसन यांना परवानगीन देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

कमल हसन यांच्या विरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. निवडणुकीच्या लाभासाठी धर्माचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला. भाजपच्या नेत्या आश्‍विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली. न्या. जी. एस. सिस्तानी आणि न्या. ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. कमल हसन यांचे हे विधान उच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेबाहेरचे आहे. त्यामुळे त्यावर सुनावणी होऊ शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Web Title: Eggs Stones Thrown at Meeting Addressed by Kamal Haasan in Aravakurichi
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com