देशभरात आज ईद उल अधा अर्थात बकरी ईदचा उत्साह

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

देशभरात आज ईद उल अधा अर्थात बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. नमाजनंतर घरांमध्ये बोकडांची कुर्बानी देऊन सुन्नते इब्राहीमी अदा साजरी होईल.

बकरी ईदच्या निमित्ताने बाजारपेठाही फुलल्या आहेत. बकरी ईदच्या दिवशी बोकडांची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे देशासह राज्यातही बकरी आणि बोकडांची मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात बोकडांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनीही ईद उल अधाच्या मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत.

WebTitle : marathi news eid al adha bakri eid celebrations  

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live