मंत्रिमंडळात एकनाथ खडसेंचं पुनरागमन ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेते यांच्यातला राजकीय सलोखा तर सर्वश्रूतच आहे. येनकेन कारणाने खडसे मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण, हेच सख्खे मित्र आणि पक्के वैरी जळगावमध्ये एकत्र दिसले.

एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमासाठी, मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे एकाच कारमधून उतरले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमापेक्षा उपस्थितांमध्ये फडणवीस-खडसे भेटीचीच चर्चा दिसून आली.

भाजपचं सरकार येऊनही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नभंग आणि भोसरी येथील भूखंड प्रकरणी सोडावं लागलेलं मंत्रीपद यामुळे खडसेंच्या मनात फडणवीसांबाबत आकस निर्माण झाला होता. अन् तो अनेकदा सर्वांनी अनुभवला. मात्र, जळगावमधील या दृश्यांनी दोघांमधील दरी मिटत असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळात एकनाथ खडसेंचं पुनरागमन झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

WebTitle :: marathi news eknath khadse and devendra fadanvis shared same cam for attaining an event  in jalgaon 

संबंधित बातम्या

Saam TV Live