जनता व्यथित असताना मंत्रिमंडळात जाऊन काय फायदा ? - एकनाथ खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

राज्यमंत्रिमंडळात पुन्हा परतण्याची इच्छा नसल्याचं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. जनता व्यथित असताना मंत्रिमंडळात जाऊन काय फायदा असा सवाल खडसे यांनी उपस्थित केलाय. मंत्रिमंडळात जाण्यापेक्षा जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडणार असल्याचा निर्धार खडसेंनी व्यक्त केलाय. आतापर्यंत खडसे हे मंत्रिमंडळात समावेश होत नाही म्हणून नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण आता खडसेंनी मंत्रिपद नको असं सांगत एकप्रकारे भाजप सरकारची कामगिरी किती खालावली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live