एकनाथ खडसे महाविकास आघाडीत जाणार?

एकनाथ खडसे महाविकास आघाडीत जाणार?

नवी दिल्ली : भाजप नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. एकनाथ खडसेंनी काल नवी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले होते. मात्र त्यांना भेट नाकरण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे खडसे पवारमार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अशातच ते आज उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

भाजपमधून बाहेर पडण्याचे सूतोवाच करणारे व इशारे देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिल्लीवारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र त्यांना भाजपाध्यक्ष तर सोडाच; पण कार्यकारी अध्यक्षांचीही वेळ रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती. ""आपल्याला पक्षातून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. मी "यांची' आरती करावी काय?'' असे विचारणारे खडसे यांना भाजपच्या दृष्टीने बोलायचे तर रिकाम्या हातानेच माघारी परतण्याची वेळ येणार असे दिसत आहे. 

खडसे यांनी दिल्लीत सकाळी दाखल झाल्यावर सायंकाळी पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. उभयतांत अर्धा तास चर्चा झाली. नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकले नसले तरी रावेर भागातील शेळगाव बंधारा व बोदवड सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात ही चर्चा झाल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पवार यांना भेटून खडसे अर्धा तासात बाहेर येतात त्याअर्थी त्यांना फारसा आशादायक प्रतिसाद मिळाला असण्याची चिन्हे नाहीत. 

दरम्यान, खडसे यांनी भाजप नेतृत्वाचीही भेटीची वेळ मागितली असली तरी गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरापर्यंत लोकसभेत असल्याने त्यांना आजची वेळ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यास सांगण्यात आले. मात्र नड्डा यांचीही आजची वेळ मिळणार नसल्याचे नंतर सांगितले गेले. त्यानंतर खडसे यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

 आता मुख्यमंत्री ठाकरेंना भेटणार 
खडसे यांची दिल्ली येथे दोन दिवसाचा दौरा होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते तातडीने विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहे. रात्री साडे आठवाजेपर्यंत ते मुबंईत पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. ते राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पासंदर्भातच ते चर्चा करणाऱ्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु भाजपवर नाराज असलेल्या खडसेंची राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्या मुबंईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट होत असल्याने राज्यातील राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. 

 दरम्यान, आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नाराज खडसेंबाबत चर्चा होण्याची शक्यताय. त्यामुळे आजच्या मुंबईतील भाजपच्या बैठकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

Web Title: eknath khadse cm thakre meet mumbai

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com