VIDEO | खडसेंविरुद्ध फडणवीसांमध्ये जोरदार टोलेबाजी, पाहा एकमेकांवर ओढलेले ताशेरे

साम टीव्ही
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020
  • 'मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही'
  • देवेंद्र फडणवीसांचा खडसेंना टोला
  • 'तुम्ही उत्तम प्रकारचे ड्राय क्लिनर'
  • फडणवीसांच्या टीकेला खडसेंचं उत्तर 

या सरकारला आता कोरोनाशी नाही तर कंगनाशी लढायचंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालंय. सरकारनं आपली 50 टक्के क्षमता जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तरी अनेकांचे जीव वाचतील असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावलाय.

फडणवीसांनी मराठा आरक्षणावरूनही सरकारवर आरोप केलाय. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार अपयशी ठरलंय अशी टीका त्यांनी केलीय. तर माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ खडसेंनाही चिमटा काढलाय. खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना त्यांचा उल्लेख ड्राय क्लिनर असा केला होता. 

पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले -

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला एकनाथ खडसेंनीही लागलीच उत्तर दिलंय. खडसेंनी फडणवीसांना तुम्ही उत्तम ड्राय क्लिनर आहात असं म्हंटलंय.

पाहा व्हिडिओ -