एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला...

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

भाजप नेते एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी रवाना झालेत. खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र पंकजा मुंडेंशी भगवान गडावरच्या तयारीबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. या भेटीची वेळ मिळाल्यास उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी पोहोचले होते. मागच्या आठवड्यात मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसेंनी दिल्यावर ते पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले होते. खडसे खरोखरच वेगळी भूमिका घेणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालाय. आणि आता ते पंकजा मुंडेंच्या भेटीला जाणार असल्यानं आणखी चर्चा-वितर्कांना वाट मिळालीय.

खडसे भाजपमध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. खडसे हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा होती. पण, त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. भाजपमध्ये बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोणी पक्षविरोधात कामे केलेल्यांची नावे आपण वरिष्ठांकडे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

"काल मी दिल्ली गेल्या नंतर राजकीय घडामोडी वाढत आहे. माझ्याकडे असलेले पुरावे मी चंद्रकांतदादा पाटील यांना दिले आहेत त्यानंतर त्यांच्याशी काही बोलणे झाले नाही..पंकजा मुंडे यांची आज मी भेट घेणार आहे. भगवान गडावरची तयारी याबाबत चर्चा करणार आहे..मी स्वतः भगवान गडावर जाणार आहे..मला माहित नाही माझी नाराजी दूर करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत." असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलंय.

Web Title - Eknatyh khadse going to meets pankaja munde

संबंधित बातम्या

Saam TV Live