पाच राज्यांच्या निवडणुकांचं वाजलं बिगुल.. आजपासून आचारसंहिता लागू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली :  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर, मिझोराम आणि मध्यप्रदेश 28 नोव्हेंबर, छत्तीसगड आणि तेलंगणा 7 डिसेंबर मतदान घेण्यात येणार आहे. तर या निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) दिली.

 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे - 

 1. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबरला 2 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.
 2. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
 3. 12 नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 
 4. 18 विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
 5. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 2 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असेल.
 6. मिझोराम आणि मध्यप्रदेश 28 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार 
 7. राज्यस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार
 8. व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर केला जाणार आहे.
 9. 11 डिसेंबर 2018 ला मतमोजणी होणार. 
 10. एका राज्यामुळे पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली.
 11. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा निवडणुका घेण्यात येणार
 12. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाकडून थोडा बदल करण्यात आला आहे.
 13. या पाच राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

WEB TITLE : marathi news election commission on India declared dates of election for five state 

संबंधित बातम्या

Saam TV Live