आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

सटाणा : सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार याद्या सदोष असल्याने त्यांची दुरुस्ती करावी, सामुहीक नावांच्या सातबारा धारक शेतकऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी आणि नव्याने गणरचना व आरक्षण काढण्यात यावे, यासाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा एकमुखी निर्णय काल शुक्रवारी (ता. 23) येथे झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दोन्ही बाजार समित्यांच्या सदोष मतदार याद्या गणरचना व आरक्षणामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर मार्ग काढण्याकरीता निवडणुकीतील इच्छुक उमेदवार व मतदारांसमवेत चर्चा करण्यासाठी काल शुक्रवारी (ता.23) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी येथील विश्राम गृहावर सर्व पक्षीय बैठीकीचे आयोजन केले होते. त्यावेळी बागलाण तालुक्यातून आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या चर्चेअंती हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंत अहीरे होते.

दोन्हीही बाजार समितीच्या आगामी निवडणुकी करिता प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार याद्या सदोष असलयाने त्यांची दुरुस्ती करावी, सामुहीक नावांच्या सातबारा धारक शेतकऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी आणि नव्याने गणरचना व आरक्षण करण्यात यावे या संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कारण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्या नियमानुसार बाजार समितीच्या निवडणुकीत पाचगण आरक्षित करण्यात आले असुन त्यात अनुसुचित जाती, जमाती भटक्या विमुक्त जाती, इतर मागास प्रवर्ग व महीला राखीव यांचा समावेश आहे. तर उर्वरीत दहा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. मात्र सदोष मतदार याद्यांमुळे अनेक शेतकरी मतदानापासुन वंचित रहाणार असून ज्यांच्या नावे एक गुंठा देखिल शेतजमीन नाही त्यांच्याही नावांचा समावेश मतदार याद्यांमध्ये करण्यात आला असल्याने खऱ्या मतदारांवर अन्याय झाला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे, उपमुख्यप्रशासक विशाल सोनवणे, प्रशासक साहेबराव सोनवणे, बाजार समितीचे माजी सभापती शैलेश सुर्यवंशी, प्रशांत बच्छाव, दाक्षिण भाग सहकारी सोसायटीचे संचालक मनोहर देवरे, मोठाभाऊ नंदन, माधव सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, शिवाजी पवार, सुनील खैरनार, शिवाजी रौदळ, अरविंद सोनवणे, अमोल बच्छाव, किरण पाटील, बापू बागुल, अनिल चव्हाण, वीरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, शरद सोनवणे, प्रकाश निकम, शिवसेनेचे शहराध्यक्ष जयप्रकाश सोनवणे, डॉ.प्रशांत पाटील, भाऊसाहेब राजे, भिका सोनवणे, भाऊसाहेब सुर्यवंशी, संजय बिरारी, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहीरे, माजी उपसभापती वसंत भामरे, सुभाष नंदन, साखरचंद कांकरिया, भास्कर सोनवणे, सुभाष सोनवणे, मुन्ना सुर्यवंशी, भैय्या सुर्यवंशी, सुभाष सावकार, रमेश अहीरे, काशिनाथ नंदन, शरद नंदन, संजय पवार, संदिप पवार, आनंद सोनवणे, के.टी. ठाकरे, राजेंद्र भामरे, प्रभाकर रौंदळ आदींनी भाग घेतला. या महत्वपूर्ण बैठकीस तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com