राज्यात धावणार इलेक्ट्रीक कार; सरकार एक हजार वाहनं भाडेतत्वावर घेणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

येणार येणार म्हणत असं म्हणत अखेर बहुचर्चित इलेक्ट्रीक कार राज्य सरकारच्या ताफ्यात दाखल झालीय. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात ईईएसएलनं सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्य़ेष्ठ अधिकाऱ्यांना पाच इलेक्ट्रिक कार हस्तांतरीत केल्या..या निमित्तानं मंत्रालयात दोन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात आलेत, तर नागपूरमध्ये दोन स्टेशन्स असतील. केवळ इथवरच न थांबता  ईईएसएलकडून टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्र सरकारला एक हजार इलेक्ट्रिक वाहने भाड्यानं देण्यात येतील. 

इलेक्ट्रिक कारचं वैशिष्ट्य

ही इलेक्ट्रिक कार सीएनजीवर चालणाऱ्या कारपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इंजिनचा आवाज नसल्यामुळे ध्वनी प्रदूषण टळणार आहे. शिवाय यामधून कोणताही धूर निघणार नसल्यामुळे वायू प्रदूषणही होणार नाही. ही कार एकदा चार्ज केल्यास 120 किमी चालू शकते. डीसी करंटवर चार्जिंग केल्यास 90 मिनिटात चार्जिंग पूर्ण होईल, तर एसी करंटवर चार्जिंग केल्यास 12 तास लागतील. या कारला इंधनाचा कोणताही खर्च नसेल. सरकारकडून चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर आता भर दिला जाणार आहे.

इंधनाचे दर दिवसागणिक वाढतायेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रीक कार हा लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live