कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती.. बळीराजाला मोठा दिलासा  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

शेतकऱ्यांच्या भव्य लाँग मार्चनंतर त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास राज्यसरकारनं सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलाय. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांपुढे कर्ज फेडण्याचं संकट असतानाच कृषिपंपांचे अव्वाचे सव्वा वीजबिल आल्यानं बळीराजा धस्तावला होता. त्यातच सरकारनं बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडणी सुरू केली होती.

शेतकऱ्यांच्या भव्य लाँग मार्चनंतर त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास राज्यसरकारनं सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलाय. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांपुढे कर्ज फेडण्याचं संकट असतानाच कृषिपंपांचे अव्वाचे सव्वा वीजबिल आल्यानं बळीराजा धस्तावला होता. त्यातच सरकारनं बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडणी सुरू केली होती. विरोधकांनीही याप्रश्नाकडे राज्यसरकारचं वेळोवेळी लक्ष वेधलं होतं. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अखेर कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती दिलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live