पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रवासीयांना आता वीज दरवाढीचा शॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रवासीयांना आता राज्य वीज नियामक आयोगाने झटका दिलाय. महावितरणची वीज महाग झाल्यानं राज्यातल्या जनतेच्या खिशावर भार पडणार आहे.  शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या विजेचा दर सध्या 3 रूपये 35 पैसे प्रतियुनिट आहे.

तो आता 3 रूपये 55 पैसे करण्यात आलाय. घरगुती वापरासाठीच्या विजेचे दरही वाढवण्यात आल्याची माहिती एमईआरसीचे प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी दिलीय.

घरगुती वापरासाठीच्या विजेचा दर 100 युनिटपर्यंत 5 रूपये 7 पैसे प्रती युनिट आणि 101 ते 300 युनिटपर्यंतचा दर 8 रूपये 74  पैसे प्रती युनिट होता. तो आता 5 रूपये 31 पैसे  प्रती युनिट आणि 8 रूपये 15 पैसे  प्रति युनिट होणारय..दुसरीकडे मुंबईत मात्र वीज दरवाढ होणार नाही. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live