'एल्फिन्स्टन रोड' स्टेशन आता 'प्रभादेवी'; 'एल्फिन्स्टन रोड' स्टेशन इतिहासजमा  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

बऱ्याच वर्षांपासून मागणी होत असलेल्या  'एल्फिन्स्टन रोड' स्टेशनच्या नामांतराला अखेर मुहूर्त मिळालाय. पश्चिम रेल्वे मार्गावरील 'एल्फिन्स्टन रोड' स्टेशनवर अखेर 'प्रभादेवी' हा नामफलक लावण्यात आला आहे. रात्री 12 वाजता या स्टेशनच्या नामांतराचा सोहळा पार पडला. 

केंद्र सरकारनं नावात बदल करण्याच्या दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी असं ठेवण्यात आलं. स्टेशनवर सर्व ठिकाणी प्रभादेवी असे फलक लावण्यात आले असून, तसा बदल इंडिकेटरवरही करण्यात आला आहे. त्याचबरोबर, PBHD असा आता प्रभादेवी स्टेशनचा कोड असणार आहे.  

WebTitle : marathi news Elphinstone Road station now prabhadevi station mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live