गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ धनंजय मुंडेंचं हे भावनिक ट्विट

गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ धनंजय मुंडेंचं हे भावनिक ट्विट

बीड : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. दरम्यान, आज गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मेळावा घेत असून, यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे.
संघर्षाचा... जनसामान्यांच्या कल्याणाचा...
सदैव आपल्या आठवणीत!

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन pic.twitter.com/0gtmcxZ9h1

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2019

बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आज होत आहे. पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केले आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. या पोस्टसह धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोसमोर नतमस्तक झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. 

जनसामान्यांचे नेतृत्व, तरुणाईचे आदर्श, शेतकऱ्यांचे कैवारी, राजकारणातील मानबिंदू पद्मविभूषण आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना!@PawarSpeaks pic.twitter.com/LrAkIEQEli

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2019

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना!’ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान सप्ताह’ साजरा केला जात आहे, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

Web Title: This emotional tweet by Dhananjay Munde in commemoration of Gopinath Munde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com