झटपट नोकरीसाठी इंजिनियरवर आली ही वेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

पिंपरी - ज्याला पदवी प्राप्त करणे शक्‍य नाही, त्याने आयटीआय करावा आणि नोकरी धरावी, हा आपल्याकडील सर्वसाधारण प्रवाह. पण, आता बदलत्या ‘जमान्या’नुसार अनेक तरुण-तरुणी आयटीआयची वाट धरू लागले आहेत. बीए, वाणिज्य शाखेच्या पदवीधरांचा त्यात सहभाग असून, नोकरीची हामी, हे एकमेव कारण त्यामागे पाहायला मिळत आहे. यंदा ४० पदवीधर विद्यार्थ्यांनी शहरातील चारही आयटीआयमधून प्रवेश घेतला आहे.

इंजिनिअरिंग पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही त्यातील संख्या कमी नाही.शासकीय, महापालिका आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी वाढणारी इच्छुकांची संख्या, हा शैक्षणिक बदल अधोरेखित करते.

इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत असतानाही त्याला फाटा देऊन  आयटीआयला पसंती दर्शविणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. याव्यतिरिक्तही बी.एड., डी.एड. किंवा अन्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २० टक्के विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतल्याची माहिती मोरवाडी आयटीआय प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

शासकीय आयटीआयमध्ये मागील वर्षी २० ते २५ हजार रुपये मासिक वेतनाच्या नोकऱ्या व चांगले ‘प्लेसमेंट’ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा शासकीय आयटीआयकडे वाढला आहे. स्वाभाविकच प्रवेश प्रक्रियेमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. 
- बसवराज विभूते, प्राचार्य, आयटीआय

Web Title: Engineer ITI Admission Education

संबंधित बातम्या

Saam TV Live