अभियांत्रिकी प्रवेशाचा विद्यार्थ्यांना मनस्ताप

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

पुणे - अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करताना अजूनही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज भरण्याचे संकेतस्थळ सुरू न होणे, सुरू झाले तर संथपणे चालणे, वारंवार सर्व्हर डाऊन होणे या प्रकारांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

पुणे - अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करताना अजूनही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज भरण्याचे संकेतस्थळ सुरू न होणे, सुरू झाले तर संथपणे चालणे, वारंवार सर्व्हर डाऊन होणे या प्रकारांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

गेल्या वर्षापर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. त्या वेळी प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयात सुविधा केंद्र वा प्रवेश निश्‍चित केंद्र दिले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या महाविद्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येत होती. या वर्षी ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने हाती घेतली आहे. या प्रक्रियेच्या सुविधेसाठी नवी सेतू केंद्रे देण्यात आली आहेत. ती निवडक ठिकाणी असल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दूर अंतरावरून त्या ठिकाणी जावे लागत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे आणि आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत २१ जून आहे. मात्र, अजूनही संकेतस्थळासंबंधी तांत्रिक अडचणी असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. यामुळे त्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. मुंबईच्या कार्यालयात दूरध्वनी केला, तर ते सातत्याने व्यस्त लागत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण झाले असल्याची तक्रार अनेक पालकांनी केली.

राज्य सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते आणि सहसंचालक डॉ. सुभाष महाजन यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांचेही दूरध्वनी बंद आहेत. तंत्रशिक्षण संचालकांना याबाबत विचारले असता या वर्षी प्रवेश प्रक्रिया संचालनालयाकडे नाही, तर सीईटी सेलकडे आहे. या प्रक्रियेत संचालनालयास सहभागी करून घेतले नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Engineering Admission Computer Process Website Change Student Problem


संबंधित बातम्या

Saam TV Live