भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून तिसरी कसोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी, आजपासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. आता स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी भारताला तिसरी लढत जिंकणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, सलग तिसरी लढत जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. सध्या भारताला सलामी जोडीचा प्रश्नही सतावत आहे. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल अशा तिघांनाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. लॉर्ड्स कसोटीत कोहलीला पाठीचा त्रास जाणवला होता. यातून तो सावरत आहे. जसप्रीत बुमराह नुकताच दुखापतीतून सावरला असून, आर. अश्विन आणि हार्दिक पंड्याही फिट झाले आहेत. तिसऱ्या कसोटीत दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे.

WebLink : marathi news england india third test to start from today 

संबंधित बातम्या

Saam TV Live