होणार सून मी अंबानींच्या घरची

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

देशातील सर्वात श्रीमंत घराण्यात लवकरच थोरली सून येणार आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांचे थोरले सुपूत्र आकाश अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. आकाश अंबानी 
श्लोका यांची नुकतीच प्री एन्गेजमेंट सेरिमनी झाली आणि त्यानंतर ग्रॅण्ड पार्टीही! तसं पाहिलं तर आकाश-श्लोकाचं लग्न डिसेंबरमध्ये आहे. पण लगीनघाई मात्र आत्तापासूनच सुरु झालीय. आकाश आणि श्लोकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओज आता व्हायरल होऊ लागले आहेत. पण अनेकांना अजून प्रश्न पडलाय. ही श्लोका आहे तरी कोण?

देशातील सर्वात श्रीमंत घराण्यात लवकरच थोरली सून येणार आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांचे थोरले सुपूत्र आकाश अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. आकाश अंबानी 
श्लोका यांची नुकतीच प्री एन्गेजमेंट सेरिमनी झाली आणि त्यानंतर ग्रॅण्ड पार्टीही! तसं पाहिलं तर आकाश-श्लोकाचं लग्न डिसेंबरमध्ये आहे. पण लगीनघाई मात्र आत्तापासूनच सुरु झालीय. आकाश आणि श्लोकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओज आता व्हायरल होऊ लागले आहेत. पण अनेकांना अजून प्रश्न पडलाय. ही श्लोका आहे तरी कोण?

देशातील सर्वात श्रीमंत घरात आता लग्नाची धामधूम सुरु झालीय. घरातलं पहिलं लग्न आणि तेही अंबानींच्या! म्हंटल्यावर ग्रॅण्ड प्लॅनिंग असणारच. मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अंबानींच्या घरची थोरली सून होणारी ही लकी गर्ल आहे श्लोका मेहता!

 

कोण आहे श्लोका मेहता :

  • श्लोका ही भारतातील टॉप -5 हिरे व्यापाऱ्यांपैकी एक असलेले रसेल मेहता यांची धाकटी मुलगी
  • 11 जुलै 1990 मध्ये मुंबईतच श्लोकाचा जन्म झाला.
  • धीरुभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर शोल्का अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली.
  • अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत अँथ्रोपोलॉजी अर्थात मानववंशशास्त्राचं तिनं शिक्षण घेतलं.
  • श्लोकानं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉची पदवी घेतली.
  • सध्या श्लोका रोजी ब्लू फाउंडेशन या डायंमंड कंपनीची डायरेक्टर आहे.
  • रसेल मेहता यांचा हा बिझनेस असून 2014 पासून श्लोका डायरेक्टर म्हणून काम पाहतेय.
  • श्लोका ही आपल्या होणाऱ्या सासूबाईंप्रमाणे सोशलवर्कमध्ये एॅक्टीव्ह आहे. ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची ती संस्थापक आहे. 
  • जवळपास 1700 करोडची श्लोका ही मालकीण आहे
  •  श्लोकाला फिरायला आणि म्युझिक प्रचंड आवडतं.

आकाश आणि श्लोकाची लव्हस्टोरी 

अंबानी आणि मेहता कुटुंबाचे तसे आधीपासूनच मैत्रीचे संबध आहेत. खरं तर आकाश आणि श्लोका हे  बालमित्र आहेत. दोघांनीही धीरुभाई अंबांनी इंटरनॅशल स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतलं. इथंच त्यांची मैत्री झाली आणि नंतर याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शालेय शिक्षणानंतर आकाश आणि श्लोका दोघेही उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. दोघांमधलं अंतर  वाढलं असलं तरी मनं जवळ येऊ लागली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागलं. "आम्ही आमच्या मुलांना त्यांचा लाईफ पार्टनर निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलंय. असं निता अंबानी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या. जेव्हा माझ्या मुलाला लग्न करायचं असेल तेव्हा त्याची पसंती ही आमची पसंती असेल. त्याच्या आनंदातच आमचा आनंद आहे असं टीपीकल मम्मीवालं SENTENCE नीता अंबानींनी केलं होतं", आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमाला नात्यात बदलण्याचा निर्णय अंबानी आणि मेहता कुटुंबीयांनी घेतला. २४ मार्चला गोव्यात दोघांचीही प्री-एंगेजमेंट सेरेमनी झाली. खरं तर गोव्यात दोघांचीही Engagement झाल्याचं कळतंय.

चर्चा तर होणारच..

आता अंबानींच्या मुलाचं लग्न होणार, त्याचा साखरपुडा, अंबानींच्या घरची पार्टी हे सगळं म्हंटल्यावर सोशल मीडिया शांत कसं राहणार. गेल्या 2- 3 दिवसांपासून सोशल मीडियावर आकाश- श्लोकाचे फोटो त्यांच्या ग्रॅण्ड पार्टीतील सेलेब्सचे फोटो वायरल होत आहेत. यात खास गोष्ट म्हणजे इथही श्लोकाला तिच्या गाऊनवरुन ट्रोल करण्यात आलं. अंबानी कुटुंबीयांचे गोव्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते एंगेजमेंटचेच आहेत असा दावा सोशल मीडियानं केला तर आता हे फोटो एंगेजमेंट की  प्री एंगेजमेंट सेरेमनीचे आहेत हे मात्र समजू शकलेलं नाही. मात्र यात श्लोकानं घातलेला ड्रेस मात्र चर्चेत आला. अंबानींच्या होणाऱ्या सुनेनं साखरपुड्यात फक्त 75 हजारांचा ड्रेस कसा घातला असा प्रश्न ट्रोलर्सनं केलाय. तर एका इव्हेंटला आलियानंही असाच काळा ड्रेस घातला होता. त्यामुळे श्लोकाला काहींनी तर चक्क कॉपी कॅट म्हंटलंय. तर पार्टी दरम्यान आकाशनं फोटोग्राफर्सना चांगला फोटो छापा म्हंटलं होतं. हा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झालाय. याशिवाय श्लोका आणि आकाशचे काही क्यूट फोटोज आणि व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागले आहेत. असो.. गेल्यावर्षी विरुष्काच्या लग्नाची संपूर्ण वर्षभर चर्चा रंगली आणि अखेर विवाह सोहळा पार पडला. आता तर मुकेश अंबानींच्या मुलाच लग्न .. मग चर्चा तर होणारच ना!

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live