राज्याची अर्थिक स्थिती सुधारण्यासाठी समिती स्थापन, साम टीव्हीच्या आवाहनानंतर सरकारचा निर्णय

साम टीव्ही
मंगळवार, 14 एप्रिल 2020

साम टीव्हीच्या आवाहनानंतर आता राज्य सरकारनं आर्थिक कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरु केलाय. यासाठी आता राज्य सरकारकडून अर्थतज्ज्ञांची समिती नेमण्यात आलीय. ही समिती राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल देणार आहे.

साम टीव्हीच्या आवाहनानंतर आता राज्य सरकारनं आर्थिक कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरु केलाय. राज्याचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देण्यासाठी सरकार पावलं राज्य उचलंतंय. यासाठी आता राज्य सरकारकडून अर्थतज्ज्ञांची समिती नेमण्यात आलीय. ही समिती राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर राज्य सरकार उपयायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करु शकेल. याबाबत वित्त विभागानं शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलीय. ही समिती सरकारला उपाययोजना सुचवणार आहे.

साम टीव्हीनं अर्थव्यवस्थेबाबत याआधी घेतलेली भूमिका

या समितीतील तज्ज्ञ

या समितीत जे. एस. सहानी (सेवानिवृत्त आयएएस), सुबोधकुमार (सेवानिवृत्त आयएएस), रमानाथ झा (सेवानिवृत्त आयएएस), उमेशचंद्र सरंगी (सेवानिवृत्त आयएएस), जयंत कावळे (सेवानिवृत्त आयएएस), सुधीर श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयएएस), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा परिणाम राज्याच्या उत्पन्नावर आणि पर्यायाने विकासकामांवर होतोय. त्यामुळे अर्थव्यवस्था लवकरात लवकर पूर्वस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात उपाययोजना सूचवण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. 

याआधी साम टीव्हीने ही भूमिका घेतली होती होती, त्याची दखल आता सरकार घेताना दिसतंय.
WEB TITLE - Establish a committee to improve the financial condition of the state


  


संबंधित बातम्या

Saam TV Live