गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना EVM हॅकिंगची कल्पना होती म्हणून - अमेरिकन हॅकर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केलाय. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केलाय. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. परंतु शुजा या सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे खळबळ उडालीय.
 
आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो असा दावाही त्यानं केलाय. त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसंच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आलं होतं, मात्र कपिल सिब्बलवगळता अन्य कुणी गेलेलं नाही. 

ही पत्रकार परिषद लंडनमध्ये पार पडली. शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात होता. 

संबंधित बातम्या

Saam TV Live