माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.

भारतरत्न हा पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणात मोठे योगदान आहे. त्याची नोंद घेऊन प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live