Congress अध्यक्ष #RahulGandhi यांनी निवडणूक काळात मराठी माध्यमांना दिलेली पहिली मुलाखत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 एप्रिल 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशाकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टीकोन समजला. त्यांनी देशासाठी मोठी स्वप्न पाहिली आहेत, हे नक्की, असे ट्विट करत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकिय संचालक अभिजीत पवार यांनी राहुल गांधींच्या घेतलेल्या मुलाखतीबद्दल माहिती दिली. 'सकाळ'मध्ये राहुल गांधी यांची विस्तृत मुलाखत उद्या (गुरुवार) प्रसिद्ध होणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक काळात मराठीमध्ये पहिल्यांदा मुलाखत देण्यासाठी महाराष्ट्रातील नं. 1 दैनिक 'सकाळ'ची निवड केली आहे. त्यामुळे या मुलाखतीत राहुल गांधी यांनी प्रश्नांना दिलेली उत्तरे उत्सुकतेचा विषय बनला आहे. काँग्रेस गरिबांना न्याय कसा देईल? 2014 नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? काँग्रेसमधल्या घराणेशाही, गुणवत्ताशाहीबाबत काय सांगाल? मोदी राष्ट्रवादावर भर देत आहेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटते? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना राहुल गांधींनी उत्तरे दिली आहेत.

अभिजित पवार यांनी राहुल गांधींची घेतलेली ही मुलाखत उद्याच्या सकाळमध्ये वाचायला विसरू नका.

Web Title: Exclusive Interview of Congress President Rahul Gandhi By Abhijit Pawar MD Sakal Media Group

संबंधित बातम्या

Saam TV Live