मे महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे हजारो रुग्ण वाढण्याची भीती, तज्ज्ञांचा इशारा

साम टीव्ही
बुधवार, 22 एप्रिल 2020

येत्या महिनाभरात मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी राज्य सरकारला दिला आहे.

येत्या महिनाभरात मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी राज्य सरकारला दिला आहे. मुंबईत मे महिन्याच अचानक रुग्णांची संख्या वाढू शकते, त्यासाठी राज्य सरकारनं तयारी करावी असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचवलंय. मे महिन्यात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक राहणार असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यासाठी झोपडपट्टी आणि दाट वस्त्यांमध्ये जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचा सल्लाही देण्यात आलाय. रुग्णांच्या चाचण्या होऊन त्यांना बरं करण्याचा कालावधी 7 ते 8 दिवसांचा आहे. तो अचानक 2 ते 3 दिवसांवर आल्यास रुग्णांना वाचवणं शक्य होणार नाही असंही या अहवालात सांगण्यात आलंय.

पाहा सविस्तर व्हिडीओ- 

यानुसार मे महिन्यामध्ये विशेषतः मुंबईत रूग्णांची संख्या हजारोंनी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, इतक्या संख्येने वाढणाऱ्या रूग्णांना उपचार देण्यासाठी अगदी काही दिवसांमध्ये यंत्रणा उभी करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. 
दाट वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांची चाचणी होऊन त्यांना उपचार मिळण्यासाठी सध्या सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. तो कालावधी दोन ते तीन दिवसांच्या आत असेल तर रुग्ण वाचवता येवू शकणार आहेत. अद्यापही काही रूग्ण स्वतःहून औषधे घेत आहे आणि परिस्थिती गंभीर झाल्यानंतर सात-आठ दिवसांनी रूग्णालयात दाखल होत असल्याने कोरोनाच्या रूग्णांचा मृत्यूदर वाढला असल्याचेही विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे.

Web Title - Experts warn of coronary outbreaks in Mumbai in May


  


संबंधित बातम्या

Saam TV Live