तुम्ही ब्रेडला नकली बटर, लोणी लावून खाताय, सावधान!

साम टीव्ही
गुरुवार, 30 जुलै 2020
  • ब्रेडला बटर, लोणी लावून खाताय, सावधान!
  • सणासुदीसाठी माव्याची मिठाई बनवताय, सावधान
  • बनावट बटर, लोणी आणि माव्याचा पर्दाफाश

सणासुदीची दिवस सुरु होणार आहेत. बाजारात मिठाईंची रेलचेल असेल. पण या मिठाई तुमच्या जीवावर बेतू शकतात. कारण, सणउत्सवांआधीच बाजारात बनावट मावा, बटर आणि लोण्याचा सुळसुळाट झालाय.

दिसायला, चवीला आणि अगदी सुगंधही हुबेहुब मावा, बटर आणि लोण्यासारखा, पण हे सगळं बनावट आहे. आणि सगळं बनवण्याचं काम सुरुय कल्याणजवळच्या एस एन इंटरप्रायझेस या दुकानात.

खाद्यपदार्थांवर कुठलेही लेबल नाहीत. दुकानाला कुठलाही परवाना नाही आणि मोठ्या कंपन्यांचे बनावट पॅकिंग वापरुन त्यात हे दुग्धजन्य पदार्थ भरुन विक्री सुरु होती.

अन्न आणि औषध प्रशासनाला याची माहिती मिळाली. आणि या पथकानं छापेमारी करुन तब्बल 1 लाख रुपये किंमतीचं अमूल कंपनीचं बनावट बटर जप्त केलंय. तर 150 किलो लोणी आणि 135 किलो मावाही जप्त करण्यात आलाय.

तुम्ही-आम्ही प्रत्येक जण घरात बटर, लोणी वा माव्याचा वापर करतो. नामांकित कंपनीचं पॅकिंग असल्यानं भेसळीची शंका कधीच आपल्याला येत नाही. आणि या प्रवृत्तीचा फायदा घेत काही धेंडं आपल्या जीवाशी खेळतात. अशा बनावट खोरांविरुद्ध कडक कारवाई व्हायलाच हवी. शिवाय आपणही हे पदार्थ खरेदी करताना ते बनावट तर नाही ना याची खात्री करुन घेतलेली बरी.


संबंधित बातम्या

Saam TV Live