'एक्सप्रेस वे'वर यंदा दरडी कोसळणार नाहीत -  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

'एक्सप्रेस वे'वर यंदा दरडी कोसळणार नाहीत, असं सांगण्यात येतंय. दरड कोसळण्यास प्रतिबंध करण्याकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विविध उपाय हाती घेतले आहेत. जुलै २०१५ मध्ये आडोशी बोगद्याजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर  आयआयटी तज्ञांच्या सल्ल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधक उपाय केले जातायेत.

'एक्सप्रेस वे'वर यंदा दरडी कोसळणार नाहीत, असं सांगण्यात येतंय. दरड कोसळण्यास प्रतिबंध करण्याकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विविध उपाय हाती घेतले आहेत. जुलै २०१५ मध्ये आडोशी बोगद्याजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर  आयआयटी तज्ञांच्या सल्ल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात प्रतिबंधक उपाय केले जातायेत. त्यानुसार आडोशी बोगदा, अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगदा येथे भूरूपशास्त्रीय तपासणी आणि सर्वेक्षण करणे, दगडी पृष्ठभागाची तपासणी, ढिले झालेले बोल्डर्स काढणे, डोंगरमाथ्यावर आणि आवश्यक त्या ठिकाणी खोदकाम करणे, रॉक बोल्टिंग करणे, जाळ्या बसवणे, विशिष्ट प्रकारची भिंत बांधणे इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड कोसळणार नसल्याचा दावा केला जातोय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live