आनंदराव अडसूळ यांच्यासह तिघांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

अमरावतीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह तिघांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिसांकडे यासंदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

जयंत वंजारी, सुनील भालेराव, कार्तिक शहा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी संगनमत करून 16 डिसेंबर 2013 ते 31 जुलै 2018 या कालावधीत सोशल मीडियावरून माझी वैयक्तिक बदनामी केली आणि याबाबत माझे पती आमदार रवी राणा यांना भेटून एक कोटी रुपयांची मागणी केली.

एवढंच नाही तर पैसे दिले नाहीत तर तुमच्या पत्नीची सोशल मीडियावर बदनामी करू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांनी दाखल केलीय. दरम्यान नवनीत राणा यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हंटलंय. 

WebTitle : marathi news extortion case regestered on anandrao adsul and three others 

संबंधित बातम्या

Saam TV Live