लॉकडाऊनमध्येही शेतकऱ्यांची पिळवणूक, शेतकऱ्यांमध्ये संताप लाट

साम टीव्ही
बुधवार, 27 मे 2020
  • लॉकडाऊनमध्येही शेतकऱ्यांची पिळवणूक 
  • महाबीजकडून सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत  वाढ
  • शेतकऱ्यांमध्ये संताप लाट

कोरोनाच्या या महासंकटामध्ये केवळ राज्यच नाही तर देशभरातील सगळ्याच क्षेत्रांमध्ये मंदीच आहे. शेती क्षेत्रावर तर कोरोनाचा वाईट परिणाम पाहायला मिळतोय. त्यातच आता महाबीजनं सोयाबीनच्या बियाण्यांच्या किंमतीत वाढ केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळलीय. 

राज्यात जवळपास 40 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा केला जातो. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन शेतीचा मोठा आधार आहे. एकीकडे मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्याकारणानं आधीच शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेलाय. असं असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी आहे.

तर बियाण्यांसाठी वापरलं जाणारं सोयाबीन हे चांगल्या प्रतीचं असतं आणि या सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करावी लागत असल्याचं महाबीजकडून स्पष्ट करण्यात आलंय.
असं असलं तरी कोरोनाच्या या महासंकटात किमान किंमतीत बियाणं उपलब्ध करणं आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक बोजा पडेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live