कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

अशा रेल्वे धावतील

01403/01402 मिरज - पंढरपूर - मिरज - 6 फेऱ्या

01403/ 01404 मिरज - कुरुदवाडी - मिरज - 6 फेऱ्या

01427/01426 लातूर - पंढरपूर - लातूर - 8 फेऱ्या

01405/01406 पंढरपूर - मिरज - पंढरपूर - 4 फेऱ्या

कार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरवर्षी प्रमाणे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील भाविक पंढरपूर येथे गर्दी करतात. आषाढी कार्तिकी निमित्त राज्यातील भाविक विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळेच रेल्वे विभागाने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना पंढरपुरात सुखरूप पोहचण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जादा गर्दी टाळण्यासाठी 17 ते 21 नोव्हेंबर पर्यंत मिरज - पंढरपूर, मिरज - कुरुदवादी,  लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज अशा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

अशा रेल्वे धावतील

01403/01402 मिरज - पंढरपूर - मिरज - 6 फेऱ्या

01403/ 01404 मिरज - कुरुदवाडी - मिरज - 6 फेऱ्या

01427/01426 लातूर - पंढरपूर - लातूर - 8 फेऱ्या

01405/01406 पंढरपूर - मिरज - पंढरपूर - 4 फेऱ्या

WebTitle : marathi news extra railways for pandharpur for kartiki ekadashi 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live