कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनला जादा डब्बे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे गणपती विशेष गाड्यांमध्ये 3 अतिरिक्त अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डब्बे जोडणार आहे. मध्य रेल्वेने 232 तर पश्चिम रेल्वेने 50 विशेष गाड्या कोकणात सोडल्या आहेत.

मध्य रेल्वेने जादा डबे जोडलेल्या गाडयांमध्ये 11 आणि 18 सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक 01095 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष गाडी, 12 आणि 19 सप्टेंबर रोजी 01096 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष 13 आणि 15 सप्टेंबर रोजी गाडी क्रमांक  01103 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष गाडीचा समावेश आहे. तसेच परतीच्या प्रवाशांसाठी 14 आणि 16 सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक 01104 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचा समावेश आहे.

उपरोक्त विशेष गाड्या आधी घोषित करण्यात आलेल्या चार डब्ब्यांऐवजी 7 अनारक्षित द्वितीय श्रेणीच्या डब्ब्यांसह चालवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

WebTitle : marathi news extra wagons for Ganesh festival special trains 

संबंधित बातम्या

Saam TV Live