जगातील टॉप ब्रँडमधून फेसबुक आऊट

जगातील टॉप ब्रँडमधून फेसबुक आऊट

प्रत्येकजण  जिथे स्वतःला व्यक्त करतो त्या फेसबुकला जगातील टॉप 10 बँडमध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. किंबहुना या यादीत फेसबुकची घसरण होऊन ते 14 व्या स्थानी पोहोचलंय.  तर या यादीत ऍप्पलनं अव्वल स्थान पटकावलंय.


ग्लोबल बँड  कन्स्ल्टन्सी इंटर ब्रँडने जगातील 100 बेस्ट ब्रँडची यादी जाहीर केली.  ऍप्पलनं या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. दुसऱ्या स्थानी गुगल, तिसऱ्या स्थानी अॅमेझॉननं मजल मारलीय. मायक्रोसॉफ्ट या यादीत चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानी कोका कोला, सहाव्या स्थानी सॅमसंग , सातव्या स्थानी टोयोटा ,आठव्या स्थानी मर्सिडीज , नवव्या स्थानी मॅकडोनाल्ड्स आणि १० व्या स्थानावर  डिज्नी आहे. फेसबुकला मात्र आपलं स्थान कायम ठेवता आलं नाही.  प्रायव्हसीबाबतचा वाद, आणि त्याची चौकशी यामुळे कंपनीला दणका बसलाय.

2018 साली पोनेमॉन इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्व्हेनुसार केंब्रिज अॅनालिटिका डेटा स्कँडलनंतर फेसबुकच्या विश्वासहार्यतेमध्ये 66 टक्क्याने घट झाली होती. 
यात फक्त 28 टक्के यूजर्सनेच फेसबुकवर विश्वास दाखवला. प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित होण्यापूर्वी 79 टक्के यूजर्सनी फेसबुकवर विश्वास दाखवला होता.
त्यामुळे काही वर्षापुर्वी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फेसबुकला उतरती कळा लागल्याची चर्चा कॉर्पोरेट जगतात सुरु झालीय.

Web Title -  face book out from top brand

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com