कुणी ठोठावला फेसबुकला कोट्यवधींचा दंड?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्ही जर फेसबुक वापरत असाल, तर ही बातमी तुम्हाला माहित असणं नितांत गरजेचं आहे. कारण फेसबुकला ब्रिटनमधील एका कंपनीनं मोठा दणका दिलाय. एका कंपनीनं फेसबुकला चक्क पाच लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. या कारवाईनंतर फेसबुकवर इतरही देशात कारवाई होण्याची शक्यताय. 

तुम्ही जर फेसबुक वापरत असाल, तर ही बातमी तुम्हाला माहित असणं नितांत गरजेचं आहे. कारण फेसबुकला ब्रिटनमधील एका कंपनीनं मोठा दणका दिलाय. ब्रिटनच्या डेटा रेग्युलेटरनं फेसबुकला तब्बल 5 लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे.

जगभरात गाजलेल्या केंब्रिज ऍनालिटिका डेटा चोरी प्रकरणी फेसबुकला मोठा दणका बसलाय. फेसबूक वापरणाऱ्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त एलिझाबेथ डेनम यांनी दिलीय.

एका कंपनीनं फेसबुकला चक्क पाच लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच तब्बल 6 लाख 60 हजार अमेरिकी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. 6 लाख 60 हजार अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 4.56 कोटी रुपयांचा दंड फेसबुकला ठोठावण्यात आल्याची माहिती ब्रिटनच्या नियंत्रकांकडून देण्यात आली आहे

ब्रिटनच्या डेटा रेग्युलेटर म्हणजेच माहिती नियंत्रकानं फेसबुकवर पाच लाख पाऊंडचा दंड ठोठावलाय. फेसबुकला तब्बल ६ लाख ६० हजार अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास ४.५६ कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या माहिती नियंत्रकांकडून ठोठावण्यात आलाय. या एका कारवाईनंतर इतर देशही फेसबुकवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title - marathi news facebook data leak action information status share zukerberg


संबंधित बातम्या

Saam TV Live